CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेटच बोलले,पार्श्वभूमी राजकीय नसूनही भाषेची.

CM eknath shinde on Manoj jarange patil आक्रमक केले कोणी?

Maratha Reservation Protest: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (27 फेब्रुवारी) वादळी चर्चेचा विषय ठरले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना वापरलेल्या शब्दांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधक यांनी चर्चेदरम्यान मांडलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिले.

या वेळी जारंगे पाटील यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट शब्दात सुनावले. जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. पण त्यांची भाषा मात्र राजकीय आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना ते असभ्य आणि एकेरी भाषेचा उल्लेख करतात. त्यांची भाषा ही भाषा कार्यकर्त्याची भाषा नाही ही भाषा राजकिय भाषा आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे बोलणे शोभत नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

CM eknath shinde on Manoj jarange patil आक्रमक केले कोणी? आरक्षण न टिकण्याची कारणे सांगा?

मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर आहे. त्यामुळेच सरकारने इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता वाढीव कोठ्यातून आरक्षण दिले. याबाबत जी अधीसूचना काढण्यात आली होती त्याव साडेसहा लाख हरकती आल्या आहेत. अनेकांना वाटतं राज्य सरकारने दिलेले 10% आरक्षण न्यायालयात टीकणार नाही. त्यांना ही शंकाच का येते? हे आरक्षण न टिकण्याची कारणे सांगा आम्ही त्यावर उत्तर देऊ, असे आव्हानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांना दिले.

Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय.

CM eknath shinde on Manoj jarange patil आक्रमक केले कोणी?

मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीही देणं-घेणं नाही’
दरम्यान, जाती-पातीत भांडणे लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे का, हे पाहावं लागणार आहे. आंदोलनादरम्यान दगडफेक कोणी केली? त्यासाठी दगड कोठून आणले याबाबतची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडविण्याचाच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. म्हणून तर मराठा समाजाच्या समूहाला मी दोन वेळा सामोरा गेलो. मला  मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीही देणं-घेणं नाही. मला फक्त मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. केवळ मराठाच नव्हे तर त्या ठिकाणी कोणताही समाज असता तरीही मी हेच केलं असतं.

Prakash ambedkar Kay mhnale https://youtu.be/ochDh42h1Xk?si=yYKE2urV7tsW06zB

म्हणूनच तर मी छत्रपती शिवरायांच्या समोर जाहीर शपथ घेतली होती, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषणादरम्यान सांगितली. (हेही वाचा, Manoj Jarange-Patil Withdraws His Hunger Strike: तब्बल 17 दिवसांनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण घेतले मागे; छत्रपती संभाजी नगरमध्ये घेणार उपचार)

Cm eknath shinde on Manoj jarange patil

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबद्दल जी भाषा वापरत आहेत ती चुकीची आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य आणि पूर्ण झाल्या आहेत. ज्या मागण्या मान्य आणि पूर्ण होण्यासारख्या होत्या त्या केल्या आहेत. त्यांनी सरकट प्रमाणपत्रांची मागणी केली. पण, त्यांना स्पष्ट सांगितले होते की, सरसकट प्रमाणपत्र हा मुद्दा मान्य होण्यासारखा नाही.

त्यांच्या मागण्या सातत्याने बदलत राहिल्या. सरकट प्रमाणपत्रानंतर त्यांनी सगेसोयरे हा मुद्दा आणला. नंतर त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात म्हटले.

Marathi aarkshan (CM eknath shinde on Manoj jarange patil आक्रमक केले कोणी?)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन, त्या आंदोलनाचे विद्यमान नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)आणि त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काढलेले उद्गार वादाचा विषय ठरले आहेत. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि वक्तव्यावरुन चर्चा झाली.

चर्चेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी मंगळवारी (27 फेब्रुवारी 2024) झाली. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी (Maratha Reservation Protest SIT Enquiry) द्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

आशिष शेलार यांच्याकडून एसआयटी चौकशीची मागणी
विधानसभेमध्ये चर्चेवेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच, त्यांचे वक्तव्य हे अत्यंत गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा उपमर्द करणारी वक्तव्ये जरांगे पाटील यांनी केली आहेत

. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी. जरांगे पाटील नेतृत्व करत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला कोणाची फूस आहे. त्यांना पैसा कोठून येतो. त्यांच्यावर जेसीबाने फुले उधळण्यासाठी कोणाकडू पैसा येतो.

ते जेसीबी कोणाच्या कारखान्यावरुन येतात? याचीही चौकशी राज्य सरकारने करावी. तसेच, या संपूर्ण आंदोलनाचीच चौकशी एसआयटी द्वारे करावी, अशी जोरदार मागणी आशिष शेलार यांनी केली. (हेही वाचा, Manoj Jarange-Patil Withdraws His Hunger Strike: तब्बल 17 दिवसांनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण घेतले मागे; छत्रपती संभाजी नगरमध्ये घेणार उपचार)

मनोज जरांगे यांना आक्रमक केले कोणी?
मनोज जरांगे यांना आक्रमक केले कोणी?

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी आक्रमक असताना विरोधकांनी वेगळी बाजू मांडली. मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मोर्चे काढले, उपोषण आणि आंदोलने केली. मात्र, तेव्हा आंदोलनात कोणत्याही प्रकारे हिंसा झाली नाही. त्यामुळे आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांवर झालेला लाठीमार कोणी केला? कोणाच्या आदेशाने झाला? याची चौकशी होणे गरजेचे आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून राज्य सरकारच त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये काय ठरत होते, कोणत्या प्रकारची आश्वासने दिली गेली होती, यावरही प्रकाश टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण, त्यांना या प्रकारचे वक्तव्य आणि आक्रमकता धारण करायला कोण जबाबदार आहे, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विरोधकांनी केली. या मुद्द्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली. (हेही वाचा, Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप – ‘मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव’)

Also read our other post https://prajashaktinews.com/maha-food-hall-ticket-2024-%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%9a-download/

1 thought on “CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेटच बोलले,पार्श्वभूमी राजकीय नसूनही भाषेची.”

Leave a comment